युगदर्शक बार्शी आयकॉन ” महिला आयकॉन” २०२० विधीज्ञा राजश्री दिपक तलवाड- डमरे जाहीर


बार्शी/प्रतिनिधी:

सलग आठव्या वर्षात जाणारा युगदर्शक आयकॉन पुरस्कार सोहळ्यातील मानाचा समजला जाणारा समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना गौरव प्राप्त करून देणारा “महिला आयकॉन ” हा पुरस्कार बार्शीतील सुप्रसिद्ध विधिज्ञा आमच्या आत्या अॅड सौ राजश्री दिपक तलवाड- डमरे यांना जाहीर झाला.
(Advertise)

बार्शी शहरात मधे त्या एक नामवंत वकील म्हणून कार्यरत आहेत. आपले वकीलीचे काम करत असताना सुद्धा त्या विविध शासकीय समिती, पोलीस ठाणे दक्षता समिती व इतर समिती व संघटना यावरती कार्यरत आहेत. आणि गोर गरीब महिला यांचे तुटणारे संसार वाचवण्यासाठी, तसेच अनेक महिलांना योग्य मार्गदर्शन देत असतात. 
(Advertise)

महिलांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या एक सामाजिक, राजकीय कार्यकर्त्या म्हणून त्यांचे नाव सबंध पंचक्रोशीत गाजलेले आहे. आपला वकिली हा व्यवसाय करत असताना सुद्धा हजारो महिलांच्या केसेस मोफत लढणाऱ्या , कोर्टात त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या , सामाजिक भान जपणाऱ्या सौ राजश्री डमरे तलवाड यांना यंदाचा आठव्या वर्षात जाणारा युग्दर्शक आयकॉन पुरस्कार सोहळा पैकी “बार्शी आयकॉन महिला” हा पुरस्कार जाहीर झाला आहे..


Post a Comment

0 Comments