Google Maps दाखवणार आता गर्दीची लाईव्ह माहिती


कोरोना महामारीमुळे गुगल मॅप्सने यासंबंधित एक नवीन अपडेटेड सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.गुगल मॅप्सच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये लाईव्ह माहिती,फूड डिलिव्हरी स्टेटस आणि बरंच काही पाहता येणार आहे.
(Advertise)

 गुगलने दिलेल्या माहितीप्रमाणे आता कुठल्या भागात जास्त गर्दी आहे हे तुम्हाला REAL TIME पाहता येणार आहे जेणेकरून तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळणं सोपं होईल. यासोबत आपण जात आहे त्या भागातील कोरोनाग्रस्तांची संख्या,  तसेच कोरोनासंबंधी मदतीसाठी स्थानिक सेवांचा संपर्क सुद्धा या Apps वर पाहू शकता.
(Advertise)

 मॅप्सवरील सर्चबारच्या अगदी खाली असलेलं लेअर्स बटण दाबलं की ग्राहकांना COVID-19 Info ऑप्शनला सिलेक्ट करून हे फीचर वापरता येतील असे गुगलने सांगितले.तसेच एक महत्त्वाचे फीचर म्हणजे तुम्हाला आता तुमचे टेक आऊट आणि डिलिव्हरी ऑर्डर्सचे स्टेटस सुद्धा गुगल मॅप्समध्ये दिसणार आहेत.

 याव्यतिरिक्त गुगल असिस्टंट ड्रायविंग मोड हेसुद्धा मॅप्स मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत.हे युजर्सना त्यांचा स्मार्टफोन कंट्रोल करण्यास. तसेच कॉल उचलण्यात किंवा गाणं बदलण्यास मदत करते त्यामुळे युजर्सना गाडी चालवताना कुठलेही अडथळे येत नाहीत.

Post a Comment

0 Comments