महाराष्ट्राचे राजकारण पवार कुटुंबाभोवती नेहमीच फिरत असते. पवार घराण्यातील चौथी पिढीने सध्या राजकारणात एन्ट्री केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिने राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सूचक विधान केले आहे. तिने ट्विटरवर विधान करून अप्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे.
‘महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचं अभिनंदन करते,’ असं ट्वीट रेवती सुळे यांनी केलं आहे.
मात्र याच ट्वीटमध्ये त्यांनी भाजपवर तिरकस शब्दांत निशाणा साधला आहे. ‘जागतिक महामारी आणि विरोधकांकडून राजकारण होत असतानाही राज्याला तुम्ही विकासाच्या रस्त्याने नेत आहात,’ असंही रेवती यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
0 Comments