खळबळजनक !बिहारमध्ये भाजपा महिला नेत्याच्या पतीची गोळ्या झाडून हत्या



बिहारमधील भोजपुर जिल्ह्यामध्ये मतमोजणीच्या काही तास आधीच भाजपा महिला मोर्चाच्या नगराध्यक्षाच्या पतीवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांची प्रकृती आणखीनच बिघडल्याने त्यांना दुसरीकडे हलवण्याची तयारी करण्यात आली मात्र वाटेतच त्यांच्या मृत्यू झाला.

मृत व्यक्तीचे नाव प्रीतम नारायण सिंह असं आहे. प्रीतम यांच्या पत्नी शहरातील भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्या स्थानिक राजकारणामध्ये खूपच सक्रीय आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्या फारच सक्रीय होत्या. अगदी प्रचारापासून ते सभांपर्यंत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्या काम करत होत्या.

या घटनेची माहिती मिळताच भोजपूरचे पोलीस अधिक्षक किशोर राय, एसडीओपी पंकज कुमार रावत यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घडलेल्या घटनेचा तपशील जाणून घेतला. 

Post a Comment

0 Comments