देशातील विद्यापीठांसह महाविद्यालयं शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू करण्यासाठी युजीसीने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र, राज्यात विद्यापीठं आणि महाविद्यालये सुरु होण्यासाठी विद्यार्थ्यांना वाट पाहवी लागणार आहे.
कारण, युजीसीच्या गाईडलाइन्सनंतर राज्यातील कॉलेज सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दिवाळीनंतर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री, कुलगुरूंच्या बैठकीनंतर निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया उच्च शिक्षणंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
१३ विद्यापीठांचा अपवाद वगळता सर्व विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पार पडल्या आहेत. मुंबई विद्यापीठाची गाजलेली परीक्षा सुद्धा पार पडली आहे. पुणे कुलगुरूंनी सांगितले की मागच्या वर्षी पेक्षा १५ टक्के निकाल वाढला आहे. दिवाळीनंतर १५ दिवसात ज्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत त्यांच्या परीक्षा घेतल्या जातील.
शिवाय जे नापास झाले त्यांच्या सुद्धा एक महिन्यात परीक्षा घेतल्या जातील. परीक्षेदरम्यान एकही मुलगा कोरोनाबधित झाला नाही. आता ते ट्विट करून म्हणतील आम्ही होतो म्हणून झाला नाही. मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्रामध्ये कुठेही बदल होणार नाहीत.
0 Comments