मराठा फोर्टस् तर्फे छत्रपतींच्या पुतळ्यासमोर आकर्षक दिपोत्सवाचा कार्यक्रम संपन्न


करमाळा/प्रतिनिधी;

दरवर्षीप्रमाणे मराठा फोर्टस्, दुर्गजागर व दुर्गभ्रमंती या संघटनेच्या वतीने छत्रपती चौक, करमाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दिपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला, मराठा फोर्टस्
 या संघटनेच्या वतीने दरवर्षी दीपोत्सवाचा कार्यक्रम राबविण्यात येत असतो त्याचे हे पाचवे वर्ष आहे.
(Advertise)

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर केलेला दीपोत्सव आणि सुरेख रांगोळी ही करमाळाकरांसाठी लक्षवेधक ठरत होती, दिपोत्सवाचा नंतर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
(Advertise)

छत्रपती शिवरायांच्या व भारत मातेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Post a Comment

0 Comments