मी गोस्वामी यांना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात निघालोय हिंमत असेल तर .....- राम कदम


वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्ये प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाली असून त्याना स्थानिक कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याबाबत ट्विट करत त्यांनी ठाकरे सरकारला इशारा देखील दिला आहे. ते म्हणतात. ‘मी सकाळी ११ वाजता मी तळोजा तुरुंगात अर्णब गोस्वामी यांना भेटायला जाणार आहे. हिम्मत असेल तर थांबवून दाखवा.. १३० कोटी देशवासीयांचे प्रतिनिधी म्हणून मी त्यांना भेटायला निघालोय,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तळोजा कारागृहात जाऊन अधिकारी कौस्तुभ कुर्लेकर यांची भेट घेतली आहे. यावेळी सोमय्या यांनी अर्णव यांना कारागृहात कोणत्याही प्रकारची मारहाण करू नये आणि चांगले जेवण द्यावे, अशी विनंती केली आहे.

Post a Comment

0 Comments