एकनाथ खडसें व आवळे यांच्यासह ५ माजी आमदारांनी हाती घेतला राष्ट्रवादीचा झेंडा



भाजपला  सोडचिठ्ठी देऊन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीकाँग्रेसमध्ये  प्रवेश केला. एकनाथ खडसे यांनी भाजप सोबत असलेली ४० वर्षांची साथ एका क्षणात सोडली. त्यानंतरही राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच आहे.

आता आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. कोल्हापुरातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे नेते आणि माजी आमदार राजीव आवळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राजीव आवळेंच्या पक्षप्रवेशानंतर हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीला आणखी बळ मिळणार आहे.

एकनाथ खडसेंसह ५ माजी आमदारांनी हाती बांधलं 'घड्याळ'
एकनाथ खडसे  यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर चार माजी आमदारांचेही तितक्याच उत्साहानं राष्ट्रवादीत स्वागत करण्यात आलं आहे. गेल्या दोन महिन्यांत राष्ट्रवादीत पाच माजी आमदारांनी राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत.

एकनाथ खडसे (मुक्ताईनगर, जळगाव) भाजपमधून, सदाशिव पाटील (खानापूर आटपाडी, सांगली) हे काँग्रेसमधून, उदेसिंग पाडवी (शहादा, नंदुरबार) हे भाजपमधून, सीताराम घनदाट (घनदाट मामा) (गंगाखेड, परभणी) हे अपक्ष तर रमेश कदम (चिपळूण, रत्नागिरी) यांनी राष्ट्रवादी-शेकाप-भाजप-काँग्रेस –राष्ट्रवादी अशी घरवापसी केली आहे. आता हातकणंगले (जि. कोल्हापूर) जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत प्रवीण सिंह पाटील मुरुगुडमध्ये मेळावा घेणार आहेत. माजी आमदार राजीव आवळे हे शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य योगीराज गायकवाड यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

जयवंतराव आवळेंच्या एकहाती वर्चस्वाला लावला होता सुरुंग

इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवलेला सर्वात तरुण चेहरा अशी राजीव आवळे यांची ओळख आहे. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी ते नगराध्यक्ष झाले होते. नगराध्यपदाच्या खुर्चीवर विराजमान असतानाच आवळेंनी वडगाव मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरुन कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. वडगाव हा काँग्रेसचा गड मानला जात होता. मात्र, राजीव आवळे यांनी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचं २५ वर्ष एकहाती वर्चस्व असलेल्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता.

राजीव आवळे २००४ मध्ये जनसुराज्य पक्षाच्या चिन्हावर हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. कुंभोज मतदारसंघातून त्यांच्या पत्नी स्मिता आवळे या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. मात्र, शिवसेनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांनी राजीव आवळे यांचा पराभव केला होता.

 


 

 

Post a Comment

0 Comments