बार्शी! कव्हे येथे पाण्यात बुडून मायलेकींचा मृत्यू



माय लेकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील कव्हे शिवारात घडला.
रोहिणी धनाजी सिंगन (वय २४), आरोही धनाजी सिंगन (वय २वर्ष) दोघीही रा.कव्हे अशी या दुर्दैवी घटनेत मृत्यू मुखी पडलेल्या माय लेकीची नावे आहेत.

धनाजी गोरख सिंगन, वय-३३ वर्ष, रा- कव्हे यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात घटनेची खबर दिली आहे. ते पत्नी- रोहिणी, दोन मुली- आराध्या व आरोही तसेच वडील आणि दोन भाऊ यांचेसह एकत्रित राहणेस असुन गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

काल दि.०४ रोजी  दुपारी १२.५१ वा चे सुमारास ते कव्हे  येथुन  बहिण मनिषाहिस भेटण्यासाठी बार्शी येथे गेले होते. त्यावेळी पत्नी रोहिणी व मुलगी आरोही असे घरी होत्या. ते बार्शी येथे बहिणीचे घरी असताना दुपारी ०१.४५ वा चे सुमारास  मोबाईल वर त्यांचा चुलत भाऊ रवि  सिंगन याचा फोन आला व सांगितले की, गळ्यात घाटी असलेली म्हैश तुझीच आहे का, ती म्हैस प्रकाश माने यांचे शेतातील विहीरीजवळ बांधलेली आहे. व विहरीत एक महिला व एक लहान मुलगी पाण्यावर खाली पाण्यात तोंड करुन तरंगत आहेत.अशी माहिती मिळाल्यावर ते माने यांचे शेतातील विहीरीवर गेले व पाहिले असता पाण्यावर
तरंगत असलेली महिला ही  पत्नी रोहिणी धनाजी सिंगन, वय-२४ वर्ष, व मुलगी आरोही धनाजी
सिंगन, वय-२ वर्ष, रा कव्हे ता बार्शी हे असल्याची खात्री झाली.

पोलीस ठाणेचे अधिकारी शिवाजी जायपत्रे व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करुन दोघींना गावातील सुशांत  सिंगन, सुरेश  घळके, सुहास  सिंगन वगैरे लोकांनी विहिरीतील पाण्यातुन बाहेर काढले. याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस करत आहेत.

Post a Comment

0 Comments