"मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या" - आमदार संजयमामा शिंदे



आमदार संजय शिंदेसाहेब हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी मराठा समाजाला ओ बी सी प्रवर्गमधून आरक्षण द्यावे असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. समाज सदैव त्यांचा ऋनी राहिल व इतर सर्व पक्षीय मराठा  आमदारानाही लवकरच अशीच भुमिका घेण्यास भाग पाडन्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आंदोलन करतील ही अपेक्षा. 

कुठलाही अहवाल न मागवता १९९४ मध्ये काही समाज घटकांना ओबीसी प्रवर्गाआंतर्गत १६ %, मराठा समाजाच्या हिश्शाचे आरक्षण, आपल्याच पुढा-यांनी खिरापत म्हणून वाटले. हे १६ % आरक्षण मराठा समाजच्या हक्काच आसून ते विस्थापित मराठा समाजाला मिळालेच पाहिजे.

ओ बी सी समाजाचे सर्व पक्षीय  आमदार संख्येने जरी कमी आसले तरी ते आपआपले पक्ष श्रेष्ठी व पक्षांना ओ बी सी समर्थनार्थ भुमिका घेण्यास भाग पाडन्यात यशस्वी झाले आहेत कारण ते स्वताच्या समाजासाठी काम करतात. 

मराठा समाजाच्या मतांवर निवडून आलेले मराठा समाजाचे सर्व पक्षीय आमदार संख्येने जास्त आसून सुद्धा मराठा समाजासाठी काम न करता ओ बी सी समाजाच्या समर्थनार्थ भुमिका घेत आहेत व त्यामुळे विस्थापित मराठा समाज ओ बी सी प्रवर्गा अंतर्गत आरक्षणास पात्र आसून सुद्धा आरक्षणा पासून वंचित आहे.

ज्या दिवशी सर्व पक्षीय मराठा आमदार विस्थापित मराठा समाजासाठी काम करायचे ठरवतील त्या दिवशी विस्थापित मराठा समाजाला ओ बी सी प्रवर्गातील आरक्षण मिळण्यापासून मुठभर ओबीसी आमदार थांबऊ शकणार नाहीत. 

 आमदार संजय शिंदेसाहेब आपण खुप चांगली सुरुवात केली आसून इतर आमदारसुधा आपलं अनुकरण करतील ही अपेक्षा.

Post a Comment

0 Comments