करमाळा /प्रतिनिधी:
करमाळा येथे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांचे वाढदिवसानिमित्त करमाळा येथील दत्त मंदीर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ५०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले असुन यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, नगरपालिकेच्या बांधकाम समिती सभापती संजय सावंत, करमाळा अर्बन बॅंकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा शिवसेना सोलापूर उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, शिवसेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख भरत भाऊ अवताडे, शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर काका लावंड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, कृ.उ.बा.समिती संचालक संतोष वारे, माजी उपनगराध्यक्ष अॅड कमलाकर वीर, नगरसेवक अतुल फंड, नगरसेवक महादेव फंड आदी जण उपस्थित होते यावेळी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे वतीने संपूर्ण महाराष्ट्रात २१ हजार रक्त दात्यांनी रक्तदान केले आहे
यावेळी बोलताना टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव म्हणाले की कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराच्या महामारी मुळे संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता यावेळी कोरोना आजाराच्या महाभयंकर संकटामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील टायगर ग्रुप च्या सर्व कार्यकर्तेना आवाहन केले होते की कोरोना संसर्गजन्य आजाराचे सावट असुन सदरचे रक्तदान शिबिर सोशल डिस्टन्स ठेवून व तोंडावर मास्क लावुन शिबिराचे आयोजन करण्यात यावे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रातुन रक्तदान शिबिराला प्रतिसाद मिळाला तसेच येणारे तीन महीने कोरोना ची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे त्यामुळे सोशल डिस्टन्स ठेवावेत व तोंडावर मास्क लावुनच घरा बाहेर आवश्यकतेनुसार पडावे व शासनास सहकार्य करावे असे आवाहन जाधव यांनी केले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व टायगर ग्रुप च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments