उर्मिला मातोंडकर यांच्या येण्याने शिवसेनेला बळ मिळेल – संजय राऊत


काँग्रेसच्या माजी लोकसभा उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा देऊन त्या राजकारणापासून दूर गेल्या होत्या. मात्र मातोंडकर यांनी पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवणार असल्याचे निश्चित केले आहे. त्या पुन्हा एकदा शिवसेना पक्षातून आपल्या राजकीय प्रवासाची सुरवात करणार आहे. आज त्या शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे. या संदर्भात इंडिया टुडेने वृत्त प्रसिद्ध केले आहे.
(Advertise)

यावर शिवसेनेचे खासदार व नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्यांच्या येण्याने शिवसेनेच्या महिला आघाडीला बळ मिळेल’, असे ते म्हणाले आहेत. तर, याआधी देखील संजय राऊत यांनी उर्मिता मातोंडकरांसारखी सडेतोड बोलणारी, देशाची आणि महाराष्ट्राची जाण असलेली, सामाजिक बांधिलकी जपणारी व्यक्ती जर विधान परिषदेत असेल तर ते महाराष्ट्रासाठी फायद्याचे होईल, असं मत व्यक्त केलं होतं.
(Advertise)

विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी ठाकरे सरकारच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्या नावात शिवसेना पक्षाकडून उर्मिला मार्तोडकर यांना संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे मातोंडकर यांचा हा नवा राजकीय प्रवास चर्चेचा विषय ठरेल, असे म्हटले जात आहे.

Post a Comment

0 Comments