"सुटा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी

दैनिक लोकपत्र या वृत्तपत्राच्या संपादकीय मधून संपादक श्री.रविंद्र तहकीक यांनी शिक्षकाविषयी अवमान करणाऱ्या शब्दांचा वापर करून , चुकीची माहिती देऊन व समाजाची दिशाभूल करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा काम केले आहे. शिक्षका विरोधी चुकीची भूमिका मांडणारा व विशिष्ट पक्षाच्या दावणीला बांधलेला हा तथाकथित पत्रकार दिसून येतो अशा प्रकारची प्रतिक्रिया शिक्षकाकडून येत आहे. खरं म्हणजे पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा मजबूत खांब म्हणून पाहिलं जाते. या देशाच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांची भूमिका व योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. पत्रकार बंधूंना समाज नेहमीच मानाचे स्थान देतो. परंतु  अशा एखादया लिखाणकर्त्यामुळे अशा चुकीच्या लिखाणामुळे गैरसमज निर्माण होतात. कोरोना काळात शिक्षकांच्या मृत्यूला जबाबदार कोण याविषयी ते काहीही  बोलत नाही.मात्र शांत,सभ्य व गुरुरुपी शिक्षकाविषयी लिखाण करण्याचं धाडस कसे काय होते हे मात्र गंभीर आहे.
           
काल  विविध समाज माध्यमावर " मास्तरडयानो जरा जास्त काम केलेत तर मराल काय" या मथळ्याखाली आलेल्या लेखावरून शिक्षकांनी खूप तीव्र शब्दात आपला राग व्यक्त केला. खरं म्हणजे शिक्षक या देशाची भावी पिढी घडवणारा एक सन्माननीय घटक आहे. तसेच आजपर्यंत शिक्षकाविषयीचा इतिहास हा सांस्कृतिक व सामाजिक बांधिलकी जपणारा घटक असाच आहे.त्यांच्याकडून कोरोनाच्या काळात त्यांनी दिलेले योगदान खूप मोठे  असून आज तागायत त्यांचे काम सातत्याने सुरू आहे. परंतु अशाप्रकारच्या बेजबाबदार व चुकीच्या लेखामुळे संपूर्ण शिक्षक वर्गाचे मन दुखावले आहे.संपूर्ण महाराष्ट्रातून शिक्षक वर्गाबरोबर इतर वर्गाकडून ही तीव्र शब्दात नाराजी व निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
          
त्याच पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटना (सुटा)या संघटनेला प्राध्यापकांनी प्रत्यक्ष भेटून,फोन करून व सोशल मीडियाच्या माध्यमातून या लिखाण करणाऱ्या व्यक्ती विषयी तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यासाठी सुचित केले.त्यामुळे आज दि.९ नोव्हेंबर २०२० रोजी सुटा संघटनेच्या वतीने या लेखाचा व लिखाण कर्त्याचा जाहीरपणे तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या बाबतची माहिती सुटा प्रमुख कार्यवाह, प्रा.डॉ.डी. एन. पाटील यांनी  दिली.

Post a Comment

0 Comments