बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं बहुमत मिळवलं आहे. त्यामध्ये भाजपला नितीश कुमार यांच्या पक्षापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत, नितीशकुमार यांच्या जेडीयूला कमी जागा जरी मिळाल्या असल्या तरी पुन्हा एकदा नितीशकुमारच बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.
बिहारच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी भाजपच्या नवी दिल्ली मुख्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी मोठ्या संख्येनं जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वात बिहारच्या विकासात कुठलीही कमी ठेवणार नाही, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अप्रत्यक्षपणे त्यांनी नितीशकुमारच मुख्यमंत्री बनणार असल्याचं जाहीर केलं असल्याचं मानलं जात आहे.
दरम्यान, भाजपचे सायलेंट वोटर महिला असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. विरोधी पक्षांवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली.
0 Comments