परंडा/प्रतिनिधी :
बालप्रतिपदा दीपावली पाडव्यानिम्मित श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी यांच्या वतीने ऊसतोड कामगारांना फराळ व अन्नधान्य वाटप करण्यात आले.
प्रतिष्ठाणच्या वतीने फटाक्यावर होणारा खर्च टाळून सहा ऊसतोड कामगार कुटूंबाना फराळ व अन्नधान्य वाटप करण्यात आले.दीपावली या सणामध्ये सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते,फराळ व अन्नधान्य वाटप करण्याचा व निस्वार्थ सेवा करून पुण्यकार्य करण्याचा योग्य आला.
या समाजसेवेतून आत्मिक समाधान व आशीर्वाद मिळतात असे प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक महादेव पाटील यांनी सांगितले.कृषि उत्पन्न बाजार समिती परंडा संचालक आण्णासाहेब जाधव,प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक महादेव पाटील,यांच्या हस्ते फराळ व अन्नधान्य वाटप करण्यात आले.या प्रसंगी श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील,स्वराज लटके,शिवराज लटके,शिवम जाधव,भारत उगले उपस्थित होते.
0 Comments