विठू नगरीतील एसटी सेवा चंद्रभागा एसटी स्टँड मधून सुरू


पंढरपूर/प्रतिनिधी:3

पंढरपूर येथे होणारी कार्तिकी यात्रा कोरोना  महामारी मुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विठू नगरी मध्ये दोन दिवसाची संचार बंदी कायदा जिल्हा प्रशासनाकडून लागू करण्यात आला आहे. त्यात एसटी महामंडळाला प्रवासी वाहतूक करण्याची सशर्त परवानगी दिली आहे. मात्र पंढरपूर मध्ये येणाऱ्या एसटी बसेस चंद्रभागा एसटी स्टँड वर थांबणार आहे.
(Advertise)

परगावाहून येणाऱ्या एसटींची होणार तपासणी
कार्तिकी वारी दरम्यान पांडुरंगाच्या नगरीमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे यासह कर्नाटक राज्यातून भाविक विठूमाऊलीच्या दर्शनासाठी येत असतात, मात्र कोरोना रोगाचा संसर्ग वाढत असल्यामुळे आषाढी वारी नंतर कार्तिकी वारी जिल्हा प्रशासन कडून रद्द करण्यात आली आहे. 

(Advertise)

मात्र पंढरपूरला येणाऱ्या एसटीला जिल्हा प्रशासनाकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे. पंढरपूर शहरालगतच्या चेकपोस्टद्वारे एसटीची तपासणी होणार आहे, त्या पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांना आपल्या ओळखपत्रासह पंढरीत प्रवेश दिला जाणार आहे, मात्र ज्या प्रवाशांकडे पंढरपूर येथील ओळखपत्र नाही, त्या नागरिकांना तेथूनच आपल्या गावी परत जावे लागणार आहे. त्यामुळे पंढरपुरात होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
(Advertise)

पंढरपुरातील मुख्य एसटी बस स्थानक बंद राहणार
पंढरपूर येथील मुख्य बस स्थानक कार्तिकी वारी यात्रात २५ ते २६ नोव्हेंबर रोजी बंद करण्यात आले आहे. पंढरपूर मधील पुणे रोड येथील चंद्रभागा बसस्थानकामध्ये एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. त्यात बस स्थानकावर राज्यातून येणाऱ्या व जाणाऱ्या एसटी बसेस यांना प्रवेश दिला जाणार आहे. परगावाहून येणाऱ्या एसटी प्रवाशांची बसस्थानकामध्ये तपासणी होणार आहे व तपासणीनंतर त्यांना ओळखपत्रासह पंढरपूर येथे जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
(Advertise)
जड वाहनांना बंदी

२२ नोव्हेंबर रोजी पंढरपूर कडे येणाऱ्या जड वाहतूक, खाजगी वाहने व किरकोळ वाहनांना पंढरपुरात बंदी घालण्यात आली आहे. पंढरपूर कडे येणाऱ्या सर्व मालवाहतूक वाहनांचे मार्ग वळवण्यात आली आहेत. आपत्कालीन व्यवस्थातील वाहनांना व एसटी महामंडळातील बसेस फक्त पंढरी प्रवेश मिळणार आहे. ही बंदी २६ नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे.

Post a Comment

0 Comments