IPL २०२० च्या स्पर्धेला टॉप ४ संघ मिळाले. मुंबईने साखळी सामन्याअंती १८ गुणांसह अव्वलस्थान कायम राखलं. दिल्लीने १६ गुणांसह दुसरं स्थान पटकावलं. बंगळुरूच्या संघाने प्ले-ऑफमध्ये स्थान पटकावलं, पण हैदराबादला तिसरं स्थान मिळालं आणि बंगळुरूला चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं.
अशी असेल प्ले-ऑफची लढाई :
१) ५ नोव्हेंबर, गुरूवार : पहिली पात्रता फेरी
मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स (दुबई)
२) ६ नोव्हेंबर, शुक्रवार : बाद फेरी
सनरायझर्स हैदराबाद vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (अबु धाबी)
३) ८ नोव्हेंबर, रविवार : दुसरी पात्रता फेरी
मुंबई-दिल्ली सामन्यातील पराभूत संघ vs हैदराबाद-बंगळुरू सामन्याचा विजेता (अबु धाबी)
४) १० नोव्हेंबर : अंतिम सामना
मुंबई दिल्ली सामन्याचा विजेता vs दुसऱ्या पात्रता फेरीतील विजेता (दुबई).
0 Comments