अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत आली आहे. देशातील राजकारणावर भाष्य करणारी आणि राजकिय नेत्यांवर टीका करणाऱ्या कंगणाने आता थेट अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन याच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या अंदाजात कंगनाने त्यांच्यावर टीका केली आहे. एक वर्ष देखील टिकणार नाही जो बायडेन यांचे राष्ट्राध्यक्षपद, असे तिने म्हटले आहे.
ती लिहिते- गजनी बायडेन यांच्याबद्दल मी शुअर नाही..ज्यांचा डेटा प्रत्येक ५ मिनिटाला क्रॅश होता. इतक्या औषधांचे इंजेक्शन त्यांच्यामध्ये इंजेक्ट करण्यात आले आहे, की ते १ वर्षाहून जास्त काळ टिकू शकणार नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, कमला हॅरिसच शो पुढे चालवतील. जेव्हा एक महिला उठते तेव्हा ती दुसऱ्या महिलेसाठी रस्ता तयार करते. या ऐतिहासिक दिवसासाठी चिअर्स!
येथे बायडेन यांना गजनी आणि त्यांचा डेटा क्रॅश होणे या वक्तव्याचा संबंध त्यांच्या स्मरणशक्तीशी आहे. चित्रपट गजनीमध्ये आमिर खान यांच्याप्रमाणे दुसऱ्या क्षणाला बायडेन सर्व विसरुन जातात, असं कंगनाला सांगायचं आहे. आता कंगनाने बायडेन यांच्यावर केलेल्या टीकेवरुन तर एक गोष्ट स्पष्ट आहे की, तिला बायडेन यांच्या विजयाचा आनंद झालेला नाही.
0 Comments