नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान- "मर्द असाल तर हे सांगूनच टाका"


 शिवसेना विरुद्ध राणे कुटुंबीय हा वाद आता उफाळून आला आहे. नुकतच शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी मुस्लिम समाजातील लहान मुलांना नमाजची गोडी लागावी म्हणून अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 

हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या शिवसेनेने अजान स्पर्धेचं आयोजन केल्याने भाजपने टीकेची झोड उठवली. अशातच भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

अहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल तर सांगून टाका की तुमच्या विभाग प्रमुखाला आपली शिवसेना आता ‘सेक्युलर’ झालीये. नाहीतर ‘हो मी नामर्द आहे’ असं तरी?, अशा शब्दात नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला.

Post a Comment

0 Comments