देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकांत केवळ कुल्हडमधूनच चहा मिळणार:रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा


 केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे त्यानुसार आता स्टेशनवर प्लास्टिक कप पूर्णपणे बंद होणार आहे.तर देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर कुल्हडमध्येच चहा मिळणार आहे.

(Advertise)

 तसे पाहिले तर सध्या देशातील ४०० रेल्वे स्टेशन्सवर प्लास्टिक कपला पर्याय म्हणून कुल्हडमध्ये म्हणजे मातीचे कपात चहा देण्यात येत आहे. 

(Advertise)

 मात्र आता प्लास्टिक कपवर कायदशीरपणे पूर्णपणे बंद होणार आहे आणि देशातील सर्व रेल्वे स्टेशनवर कुल्हडमध्येच चहा दिला जाणार आहे. दरम्यान आजपासूनच या नियमाची अमलबजावणी करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहेत.

Post a Comment

0 Comments