श्रीपत पिंपरी गावांतुन वकिलीची परीक्षा पास होणारे भारत घाडगे यांचा सत्कार


श्रीपत पिंपरी/प्रतिनिधी:

जीवनात काहीतरी करायचे हा करण्याचा भारत घाडगे यांनी निश्चय केला. श्रीपत पिंपरीतील मित्रांचे सहकार्य होते. ध्येय गाठण्यासाठी आणखी वेगळं करण्याची गरज होती. कालावधीत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून वकिलीची परीक्षा पास झाले.  

 श्रीपत पिंपरी गावातील भारत घाडगे यांनी वकिलीची परीक्षा पास होणारे पाहिले आहेत. अनंत अडचणीतून गावातून वकील होणारे पाहिले व्यक्ती आहेत. वक्तृत्व व कर्तृत्व यांची जाणीव असणारे, अत्यन्त हुशार, संयमी व्यक्तिमत्व यांचा सत्कार श्रीपत पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी सरपंच प्रतिनिधी भगवंत घुगे, तंटामुक्ती अध्यक्ष रामराजे ताकभाते, ग्रामपंचायत सदस्य भारत (नाना)ताकभाते, राम ताकभाते (गुरुजी) , लक्ष्मण घाडगे, पोलीस पाटील धनंजय घुगे, अमोल ताकभाते, पंडित ताकभाते, अक्षय ताकभाते, अतुल ताकभाते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments