ओबीसीच्या प्रश्नासंदर्भात माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचे करमाळा तहसीलदार यांना निवेदन



ओबीसी फिजे एन टी संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष मा आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहशील यांच्यामार्फत निवेदन मंगळवार दि ३ नाव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित  पवार, मंत्री छगन भुजबळ  विजय वड्डीतीवार यांना सविनय सादर ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास जातीच्या अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत, याची आपल्याला कल्पना आहे. 

ओबीसींच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण दिनांक २१ जुलै २०२० रोजी महाराष्ट्रातील ओबीसी व भटक्या विमुक्त प्रतिनिधींची ऑनलाइन बैठक आयोजित केली होती, या बैठकीत आमच्या मागण्यांचे निवेदनही सादर केले होते. यावर दोन महिने कुठलाही निर्णय न झाल्यामुळे आठ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन घेऊन निवेदने जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आपल्याकडे पाठवण्यात आले, तरी ओबीसी व भटक्या विमुक्त जातीचे प्रश्न प्रलंबित आहेत धनगर समाजाला एसटीचे आरक्षण ताबडतोब देण्यात यावे.
 
महाज्योती संस्थेला हजार कोटी रुपये देण्यात यावे, आदिवासींच्या आदिवासी बावीस योजना लागू केल्या होत्या. त्यासाठी एक हजार कोटी शासनाने ताबडतोब मंजूर करावे,  या मागण्यांचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले, यावेळी अण्णासाहेब सुपनवर, दादासाहेब नरोटे, प्रशांत शिंदे, सुभाष अभंग, अण्णासाहेब शिंदे, संतोष वारे राष्ट्रवादी अध्यक्ष करमाळा हनुमंत मांढरे, अध्यक्ष करमाळा नगरसेवक बाळासाहेब शिरसागर, विजय अभंग,  अाबासाहेब वायकुळे, राहुल चोरमले, अनिल तेरी, मच्छिंद्र कांबळे, किरण पाटील, भोजराज सुरवसे, दत्तात्रय आडसुळ, नाना आंधळकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments