भाजपच्या आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘हे सरकार पडणार’, असे सतत सांगत राहावे लागते, असा टोला राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस यांना आपली माणसं टिकवण्यासाठी सरकार पडणार, असं बोलावं लागतं. आणखी काही काळ ते असंच बोलत राहतील. त्यानंतर फडणवीस यांचं बोलणं आपोआप बंद होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. ते गुरुवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आणखी काही भाजप नेते राष्ट्रवादीच्या गळाला लागतील, असा दावा केला जात आहे.
0 Comments