"बाबा राम रहीम तुरुंगातुन या कारणास्तव बाहेर"



बलात्कार आणि हत्या प्रकरणातला दोषी असलेला बाबा राम रहीम हा एक दिवसाच्या सिक्रेट पॅरोलवर बाहेर आला आहे. त्याच्यावर अनेक महिलांचे शोषण केल्याचा आरोप सिद्ध झाले आहेत.

काल त्याला हा पॅरोल मंजूर करण्यात आला. त्यामुळे जन्मठेपेची शिक्षा भोगणारा राम रहीम एक दिवसासाठी तुरुंगाबाहेर असणार आहे. बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरल्यानंतर डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्या आईची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्याला एक दिवसाचा पॅरोल आईला भेटण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, राम रहीम फरार होऊ नये म्हणून सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments