सोलापूर जिल्ह्यात शाळा सुरूच पण पण घंटा बंद, विद्यार्थ्यांचा शाळेत येण्यासाठी झिरो प्रतिसाद



बार्शी/प्रतिनिधी:

राज्य शासनाच्या आदेशानुसार सोमवार, २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गासाठी शाळेची घंटा वाजलीच नाही, सोलापूर जिल्ह्यातील विविध शाळेच्या गेटवर मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पुष्पहार घेऊन तयारी केली होती मात्र शाळेत विद्यार्थ्यांनी न येणेच पसंत केले. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांची शाळेच्या पहिल्या दिवशी भलतीच निराशा असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळाले पालकांमधून ही शाळा बंद करण्याची मागणी होत आहे. चित्र माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील चंद्रशेखर विद्यालयात पाहायला मिळाली
(Advertise)

सोलापूर जिल्ह्याभरात नववी ते बारावीपर्यंतच्या एकूण १ हजार ८७ शाळा आहेत. जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील शाळांत २ लाख ५२ हजार ४३४ विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. गणित, विज्ञान व इंग्रजी या तीन विषयांचे अध्यापन शाळेत, तर उर्वरित विषयांचे अध्यापन हे ऑनलाईन प्रणालीने करण्याची तयारी शाळेने केली होती. कोरोना परिस्थितीमुळे दक्षता बाळगत एका बेंचवर एक, तर एका वर्गात फक्त वीस विद्यार्थीच बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राहावे यासाठी मधली सुट्टी बंद करण्यात आली व त्यानंतर शाळा सुटण्याच्या वेळेस आधी नववीचे विद्यार्थी त्यानंतर पंधरा मिनिटांनी वर्ग सोडण्याचे नियोजन शाळेने केले होते हे मात्र पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेला दांडी मारल्यामुळे शिक्षकांची निराशा झाली त्यातील काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यास शाळेत न सोडण्यास पसंत केले.
(Advertise)

आठ महिन्यापासून बंद असलेले शाळा  शिक्षकांनी  शनिवार ते रविवारी पासून  सर्व शाळांची सॅनिटायझरने फवारणी करण्यात आली आहे. शाळेतील पिण्याच्या पाण्याची टाकी व स्वच्छतागृहांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शाळेत येणार्‍या शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह सर्वांना मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. सर्व शाळेत ऑक्सीमीटर, सॅॅनिटायझर, थर्मलगनचीही सुविधा निर्माण केली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी बाबर यांनी दिली. जिल्ह्याभरातील ८५ टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी झाली असून, शाळा सुरु करण्याबाबत तयारी पूर्ण झाली आहे. 
(Advertise)

सोलापूर जिल्ह्यातील १७८ शिक्षकांना कोरोनाची लागण

कोरोनाशी संघर्ष करीत 'ज्ञानदीप लावू अंतरी' या उपक्रमांतर्गत शाळांना सुरुवात करण्यात येत आहे.शाळा सुरू करण्यापूर्वी ६ हजार ८५० शिक्षक व ४ हजार ३४८ शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. यात १७८ जणांना कोरोनाचा संसर्ग असल्याचे दिसून आल्याने त्यांना विश्रांती व उपचार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
(Advertise)

८२ टक्के पालकांकडून मिळाली संमती

कोरोना परिस्थितीशी संघर्ष करून योग्य ती दक्षता बाळगून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा आज (सोमवार) पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शाळेत येणार्‍या मुलांच्या पालकांचे संमतीपत्र घेण्यात यावे, असेही शासनाने आदेश दिले होते. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत ८२ टक्के पालकांनी आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्यास लेखी संमती दिली

Post a Comment

0 Comments