बिहार निवडणूक! ‘राजद’ नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या


बिहारमध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दरम्यान, येथील पूर्णिया जिल्ह्यात धक्कादायक गुन्हेगारी घटना समोर आल्या आहेत. येथील राष्ट्रीय जनता दलाचे नेते बिट्टू सिंह यांचे भाऊ बेनी सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

हल्लेखोरांनी धमदाहा विधानसभा क्षेत्रातील सरसी येथे मतदान प्रक्रिया सुरू असताना, त्यांच्यावर गोळीबार केला. यामुळे मतदान केंद्रावर चांगला गोंधळ निर्माण झाला होता. या हल्ल्यात बेनी सिंह यांचा मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पूर्णियाचे पोलीस अधीक्षक विशाल शर्मा घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments