"आधार कार्ड" मध्ये बदल करण्यासाठी कुणी पैशांची मागणी केल्यास इथं करा तक्रार


आधारवरील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठीची  ५० रुपये फी आकारली जाते. यासाठी नागरिकांना जवळील आधार केंद्रावर जाऊन एक फार्म भरावा लागेल. त्यानंतर २४ ते ४८ तासांत तुमचे आधार कार्ड अपडेट होईल.
(Advertise)

मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट निशु:ल्क :

यूआयडीएआयच्या नियमांनुसार ५ ते १५ वयोगटातील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट निशु:ल्क केलं जातं. वय वर्षे १५ वरील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी ५० रुपये फी आकारली जाते. आधार केंद्रावर आधार कार्डाची कलर प्रिंट काढण्यासाठी ३० रुपये फी आकारली जाते.
(Advertise)

ज्यादा फी शुल्क आकारल्यास येथे करा तक्रार :
जर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ज्यादा फी संबंधित व्यक्तीने मागितल्यास १९७ या टोल फ्री क्रमांकावर त्या व्यक्तीची तक्रार करता येते. तसंच help@uidai@gov.in या मेल आयडीवर देखील तक्रार नोंदवता येते.

Post a Comment

0 Comments