अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यानंतर अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. २०१८ सालात अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना अटक केल्यानंतर महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम!" आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे, अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
0 Comments