पंढरपूर/प्रतिनिधी : मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत (नाना) भालकेंना काही दिवसा पूर्वी कोरोनाची लागण झालीअसल्याची बातमी मंगळवेढा तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी आ.भारत भालकेच्या तब्येतीत सुधारणा होऊन लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मंदीरात प्रार्थना केली जात आहे.
आ.भालके यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी आमदार समर्थकांनी मंगळवेढा तालुक्यातील माचणुर गावातील श्री.सिद्धेश्वर मंदिरात आमदार समर्थकांनी दुधाचा अभिषेक घातला व निरोगी आयुष्य मिळावे म्हणून प्रार्थना करून आमदार भालके यांची लवकरात लवकर कोरोनातून मुक्तता करावी अशी प्रार्थना केली.
यावेळी सुनिल डोके सर,भारत बेदरे,महादेव फराटे,राजेंद्र बेदरे,हणमंत पाटील,सुभाष पवार,बिभिषन बाबर,धनंजय गायकवाड,बच्या चव्हाण,बापु बाबर,सुभाष डोके,विलास सरवळे,संकेत डोक उपस्थित होते.
0 Comments