अजय देवगण दिग्दर्शित करणार 'हा' चित्रपट, अमिताभ बच्चन पडद्यावरही दिसणार



बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आता दिग्दर्शन करणार आहे. विशेष म्हणजे अजय देवगण दिग्दर्शित या सिनेमात काम करणार आहेत बिग बी अमिताभ बच्चन.  'मेडे' असं या चित्रपटाचं नाव असून यासाठी अजय देवगण संपूर्णपणे तयार असल्याची माहिती आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासह स्वत: अजय देवगण देखील दिसणार आहे. 

'मेडे' हा सिनेमा अजय देवगण दिग्दर्शित करणार आहे. सूत्रांनी सांगितलं की, अजय  'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' मधील आपलं काम पूर्ण झाल्यानंतर या प्रोजेक्टला सुरु करणार आहे. हैदराबादमध्ये या नव्या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. 

आपला नवा सिनेमा 'मेडे'साठी  अजय देवगण खूप उत्साहित आहे. तो हैदराबादमध्ये लवकरच सिनेमाचं शूटिंग सुरु करणार आहे. या सिनेमात बच्चन यांची साथ असणं मोठी गोष्ट मानली जात आहे. बच्चन देखील या सिनेमासाठी उत्साहीत असल्याचं बोललं जात आहे.  भुज द प्राइड ऑफ इंडियाची शूटिंग संपल्यानंतर अजय देवगण आपल्या या नवीन प्रोजेक्टवर काम करणार आहे. 

Post a Comment

0 Comments