चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अचानक भेट घेतली. या भेटीमुळे अनेक राजकीय तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीचा प्रस्ताव दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आज घेतलेली ही भेट नेमकी कोणत्या विषयावर होती? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या भेटीवर राजकीय तज्ज्ञांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
या त्यांच्या भेटीचा कार्यक्रम नियोजित नव्हता. त्यामुळे नेमकी भेट कशासाठी होती, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मागील तीन दिवसांपासून रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना केलेल्या अटकेच्या नंतर भाजपाकडून राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या न्यायालयातील सुनावणीनंतर अर्णव यांना फार मोठा दिलासा मिळाला नाही.
0 Comments