महाविकास आघाडीने आज अखेर राज्यपाल नियुक्त जागांसाठी १२ सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिली आहेत.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी , गायक आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे यांना साहित्य क्षेत्रातून संधी दिली आहे.
तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी यांना संधी मिळाली आहे.
तर काँग्रेसकडून सचिन सावंत, रजनी पाटील, मुजफ्फर हुसैन तर अनिरुद्ध वणगे यांना कला क्षेत्रातून संधी दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. या यादीतील काही नावे समोर आली आहेत.
आज संध्याकाळी ६ च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली.
0 Comments