बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार?; आमदार एनडीएत सामील होण्याची शक्यता


बिहार काँग्रेसमध्ये फूट पडून त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी काही जण एनडीएत सामील होतील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. आता बिहारमध्ये काय होणार ह्यांची  राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 
(Advertise)

काँग्रेसचे १९ आमदार निवडून आले असून त्यांनी एनडीएमध्ये सामील व्हावे, असं आवाहन हिंदुस्थान अवाम मोर्चाचे नेते जितनराम मांझी यांनी केलं आहे. त्यानंतरच बिहार काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चेला वेग आला.
(Advertise)

या निवडणुकांत महाआघाडीमध्ये काँग्रेसने सर्वात खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे महाआघाडी सत्ता मिळविण्यापासून वंचित राहिली आहे.
(Advertise)

बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये काठावरचे बहुमत मिळालेल्या एनडीएने आणखी आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Post a Comment

0 Comments