"....केवळ ह्याच कारणासाठी मुंबई महानगरपालिका शिवसेनेला सोडाली" - चंद्रकांत पाटील




मुंबई महानगरपालिका भाजपाच्याच ताब्यात येणार आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

(Advertise)

आम्ही मुंबई महानगरपालिका भाजपाकडे घेणार आहोत. मागच्या वेळी आम्ही जेव्हा ८२ जागा जिंकलो त्यावेळी महापौर आमचाच बसला असता. पण अमित शाह यांनी आपल्याला राज्य चालवायचं असून मुंबई महानगरपालिका शिवसेनेला सोडा असं सांगितल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
(Advertise)

शिवसेनेचे ८४ आणि आमचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. आमचे केवळ दोन नगरसेवक कमी होते, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेत भाजपची स्वबळावर सत्ता आणण्याचा चंग बांधला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आणून दाखवू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments