मुंबईत पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?


गरज पडल्यास दिल्ली-मुंबई रेल्वे सेवा आणि विमानसेवा बंद करण्याचा पर्याय असल्याचं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. तर १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करा अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. 
(Advertise)

 मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. कारण गरज पडल्यास दिल्ली-मुंबई रेल्वे सेवा आणि विमानसेवा बंद करण्याचा पर्याय असल्याचं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. तर १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करा अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर जाऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय पालकमंत्री आणि महापौरांनी सांगितले.
(Advertise)

गेल्या काही दिवसांपासून देशाची दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याशिवाय अहमदाबादमधील रुग्णसंख्याही वाढतीच आहे. या शहरांची परिस्थिती पाहता खबरदारी म्हणून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी काही मुंबई-दिल्ली रेल्वे आणि विमानसेवा रद्द करण्याचा पर्याय असल्याचं म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments