मुबंई येथे उपमुख्यमंत्री व परिवहनमंत्री यांच्या कडे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना ने करमाळ्याचे आमदार मा संजयमामा शिंदे यांचे कडे केलेल्या मागणीचा प्रश्न मार्गी लावला.
कोविड च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मधील सोलापूर विभागातील कर्मचारी मुबंई येथे बेस्ट च्या सेवेसाठी पाठवण्यात येत आहेत, त्यामध्ये फक्त सोलापूर विभागातून कर्मचारी न घेता संपूर्ण विभागातून घ्यावेत अशी मागणी केली होती. ती मागणी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कडे आमदार मा संजयमामा शिंदे यांनी केली.कोविड च्या पार्श्वभूमीवर बेस्ट साठी महाराष्ट्र मधून ST महामंडळ चे कर्मचारी बोलवण्यात येत होते परंतु गेले ४५ दिवस फक्त सोलापूर जिल्ह्यातूनच कर्मचारी बोलवण्यात येत होते,तसेच त्यामधील ३०% कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह येते होते.
त्यावर फक्त सोलापूर जिल्ह्यातून कर्मचारी न बोलवता रोटेशन नुसार इतर संपूर्ण विभागातून ही कर्मचारी सेवेत बोलवावेत.
व फक्त सोलापूर जिल्ह्यातील कर्मचारी सेवेत बोलवू नये, रोटेशन नुसारच सर्व महाराष्ट्रातील कर्मचारी यांना सेवेत बोलवावेत. त्यावर ताबडतोब निर्णय घेऊन परिवहन मंत्री मा.अनिल परब साहेब यांना अजितदादा पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून कर्मचारी सेवेत बोलवावेत अशा सुचना दिल्या तसेच थकीत वेतन बाबत पण लवकर निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
0 Comments