पत्नीनेच लावून दिलं आपल्या पतीचं गर्लफ्रेंडसोबत लग्न



एका महिलेनं आपल्या पतीचं त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न लावून दिलं. ही घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये घडली. लग्नाच्या फक्त तीन वर्षानंतरच पतीचं अफेअर असल्याचे पत्नीला कळल्यानंतर तिनं हा निर्णय घेतला.
कौटुंबिक कोर्टाचे वकील रजनी राजानी यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एक पुरुष व महिला काउन्सिंगलाठी त्यांच्याकडे आले होते. त्या व्यक्तीने सांगितले की त्यांचे लग्न होऊन तीन वर्ष झाली आहेत. मात्र गेल्या १ वर्षापासून पतीचे अफेअर आहे. हे प्रकरण इतके पुढे गेले गर्लफ्रेंडनं लग्न न झाल्यास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

वकील रजनी यांनी त्या व्यक्तीला सांगितले की दोन महिलांसह राहणे कायदेशीररित्या शक्य नाही. रजनी यांनीही या व्यक्तीसमवेत त्याच्या गर्लफ्रेंडला समजवण्याचा प्रयत्न केला. दुसर्‍याच दिवशी रजनी यांनी या व्यक्तीला पत्नीसोबत बोलवले. यादरम्यान, पत्नीला सांगितले की पतीला काय हवे आहे. पत्नीला हे सहन झालं नाही आणि तिने एका दिवसाचा वेळ मागितला. दुसर्‍या दिवशी ती पुन्हा आपल्या नवऱ्याबरोबर आली आणि आपल्या पतीने गर्लफ्रेंडसोबत लग्न लावून देण्यास तयार झाली.

पत्नीने सांगितले की, सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून नवऱ्याला घटस्फोट घ्यायचा आहे. पतीनं जेव्हा पत्नीला पोटगी देण्याचे मान्य केले तेव्हा पत्नीनं पैसे घेण्यास नकार दिला. यानंतर पत्नीने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आणि नवऱ्यापासू घटस्फोट घेतला.

Post a Comment

0 Comments