"महावितरणने वीज बिल कमी करावे; अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू" - वैराग विभागाध्यक्ष बाबा शेख


आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना बार्शीच्या वतीने वैराग विभागातील महावितरण कार्यालयात वीजबिल कमी करण्याबाबत वैराग विभागाध्यक्ष बाबा शेख यांच्या नेतृत्वाखाली व बार्शी तालुकाध्यक्ष विक्रमसिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन आले .

    
(Advertise)

सोमवारी पर्यंत निर्णय न झाल्यास व कोणा ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडल्यास होणाऱ्या परिणामांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जबाबदार नसेल अशी तंबी वैराग विभागाध्यक्ष बाबा शेख यांनी दिली.
    
(Advertise)

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वैराग शहर अध्यक्ष प्रदीप निलाखे, रियाज शेख, जावेद शेख, खंडू सकट, बाळू क्षिरसागर, समाधान कांबळे, करन सकट, संजय कांबळे, शरूख शेख, सुरज कांबळे,.बापु लाडगे, शफीक शेख  इत्यादी मनसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments