“…राहुल गांधी शाळेतील वाईटातले वाईट विद्यार्थी, काँग्रेस नेते एकाच कुटुंबामागे कधीपर्यंत धावणार?”


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासंदर्भात उल्लेख केला आहे. यावरून भाजप नेते राम कदम यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
(Advertise)
बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांना अप्रत्यक्षपणे शाळेतील वाईटातला वाईट विद्यार्थी आहे, असं म्हटलं आहे. यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते गांधारी प्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून एक कुटुंबामागे कधीपर्यंत धावणार?, असा सवाल राम कदम यांनी केला आहे.
(Advertise)
शिवसेना त्यांना तेजस्वी हिरो आणि राहुल झिरो, असे अप्रत्यक्षपणे म्हणते. काँग्रेस नेते गप्प, प्रश्न असा आहे, काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते गांधारी प्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून एक कुटुंबामागे कधीपर्यंत धावणार?, असं राम कदम म्हणाले.
(Advertise)
देशात विचारलं की पप्पू कोण आहे? तर एका विशिष्ट व्यक्तीचं नाव समोर येतं, असंही राम कदम यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments