अतिवृष्टी अनुदानात दूजाभाव का? - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब झोळ



करमाळा/प्रतिनिधी:

राज्य सरकारने जाहीर केलेले अतिवृष्टी अनुदान काही भागात वाटप केले आहे, तर काही भागात अजून पैसे खात्यावर आलेले नाहीत तहसील कार्यालयाची ही दिरंगाई का होते आहे? आणखी किती दिवस कागदी घोडे नाचवत राहणार आहेत, इकडे शेतकरी मरण यातना भोगतो आहे.
(Advertise)

या घटनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र निषेध नोंदवला जात आहे, शेतकरी मरणयातना भोगत असताना शासन व प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.
(Advertise)
हे सरकारी बाबू या प्रक्रियेत विनाकारण विलंब लावत आहेत, जर लवकरात लवकर सर्व बाधित शेतकऱ्यांचे अनुदान जमा झाले, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, याची योग्य खबरदारी तहसील प्रशासनाने घ्यावी. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब झोळ यांनी दिला आहे अन्यथा आमचा आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे.

Post a Comment

0 Comments