गेले आठ महिने देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे.कोट्यवधी लोकांना या रोगाची लागण झाली तर लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
या रोगावर ठोस औषध नसल्याने करण्यात आलेल्या ताळेबंदीमधून सावरत असतानाच दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे पुन्हा उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
अशातच एक सकारात्मक वृत्त समोर येत आहे.पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून (SII) विकसित करण्यात येत असलेली 'कोव्हिशिल्ड' ही लस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ९० टक्के प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे.
ही माहिती खुद्द सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिली आहे.यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी करोना लसीच्या प्रगतीसंबंधी माहिती घेण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे.सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविड लस तयार करण्यात येत आहे.पंतप्रधान मोदी २८ नोव्हेंबरला पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे.
0 Comments