करमाळा/प्रतिनिधी:
करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे हे तालुक्यात अवैध धंद्यांना पाठीशी घालत असून, खोटे गुन्हे दाखल होत आहेत. असे उपोषणाच्या सुरुवातीपासून वरील मुद्द्यावर ते भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे ठाम आहेत ६ व्या दिवशी हि त्याविरोधात उपोषण सुरू केले आहे. चिवटे यांच्या बेमुदत उपोषण चालू केले आहे.
पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांची बदली करण्याची मागणी
शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील, करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, गणेश चिवटे, अतुल खुपसे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी चिवटे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत श्रीकांत पाडुळे यांची खातेनिहाय चौकशी करून बदलीची मागणी केली आहे. 6 नोव्हेंबर 2020 पासून भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, वंदे मातरम संघटनेचे सुहास घोलप यांनी करमाळा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बुधवार (ता. 11) उपोषणाचा पाचवा दिवस आहे. चिवटे यांच्या उपोषणास भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.
माजी आमदार नारायण पाटील यांचा उपोषणाला पाठिंबा
माजी आमदार नारायण पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गणेश चिवटे यांनी करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या विरोधात सुरू केलेल्या उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात येत असून,
श्रीकांत पाडुळे यांची खातेनिहाय चौकशी करावी
गणेश चिवटे म्हणाले, तालुक्यातील अवैध धंदे सुरू करण्यास पोलिस निरीक्षक पाडुळे हे खतपाणी घालत आहेत. याशिवाय ते सर्वसामान्य नागरिकांना धमकीची भाषा वापरतात, अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात. अवैध धंद्यात पाडुळे यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी.
0 Comments