“बलात्कार झाल्यानंतर स्वाभिमानी स्त्री एकतर मरण मरून जाते किंवा पुन्हा अशी घटना होऊ देत नाही,” असं वादग्रस्त विधान केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुल्लाप्पल्ली रामचंद्रनं यांनी केलं आहे. या विधानाचे पडसाद उमटल्यानंतर रामचंद्रनं यांनी सावरासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
तिरुवनंतपूर येथील काँग्रेस प्रणित युडीएफ आघाडीच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनात बोलताना रामचंद्रन यांनी हे वक्तव्य केलं. सौर ऊर्जा घोटाळा आणि सूडाच्या राजकारणाविषयी बोलताना केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुल्लाप्पल्ली रामचंद्रन म्हणाले,”जर एखाद्या स्वाभिमानी महिलेवर बलात्कार झाला, तर ती महिला एकतर मरून जाते किंवा तशी घटना पुन्हा होऊ देत नाही,” असं रामचंद्रन म्हणाले.
0 Comments