भाकनुकीतून बळीराजाच्या जगण्याला बळ देणारे फरांडे बाबा ; माढा तालुक्यातील अंजनगाव मधील आहेत फरांडे बाबा


पेरा:-रोहिणीचा पाऊस मृगाचा पेरा.  
पर्जन्य :- ७ दिवसात पाऊस पडेल. 
भक्ती :- माझी सेवा जो करील त्याला मी कांबळ्याखाली घेईन. 
रोगराई :- कानाने ऐकशीला पण डोळ्याने पाहणार नाही. 

हेडाम खेळ खेळत बिरोबाच्या नावान चांगभल चा गजर देत फरांडे बाबा यांच्या भाकनुकीकडे बळीराजासह  सर्व भक्त आसुसलेले असतात.
   
 ही भाकनूक करून परतीच्या मार्गावर असेलेले फरांडे बाबा यांचे माझ्या शिरोळ येथे निवासस्थानी आगमन झाले. आपल्या भाकनुकीतून बळीराजाच्या जगण्याला बळ देणारे फरांडे बाबा यांनी आज मला बळीराजाच्या लढाईसाठी बिरोबाचा भंडारा कपाळी लावून आपल्या कांबळ्याखाली घेतले. 
     
मला आश्चर्याचा धक्काच बसला, मी म्हंटल बाबा निरोप दिला असता तर मीच दर्शनाला आलो असतो. बाबा म्हणाले माझ्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांचा नेता आजारी पडलाय हे मला समजताच बिरदेवाचा भंडारा घेऊन आलोय, आता तुम्ही नक्की बरे होणार, लाखो शेतकऱ्यांची पुण्याई तुमच्या पाठीशी आहे. असे सांगून थोडा वेळ थांबून निघून गेले. यावेळी शिरोळचे नगरसेवक तात्या पाटील,ह.भ.प. विलासराव देशमुख(संत) हजर होते.

Post a Comment

0 Comments