३८ लाखांचा थकित पगार हडपल्या प्रकरणी संस्थाचालक बाळासाहेब कोरकेचा अटकपूर्व जामीन फेटाळला


 
वैराग/प्रतिनिधी:

आपल्या शिक्षणसंस्थेत कार्यरत असलेल्या चार शिक्षकांचा थकित पगार हडपल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील अरोपी संस्थाचालक बाळासाहेब नरहरी कोरके व जामगाव माध्यमिक आश्रमशाळेचा मुख्याध्यापक पांडुरंग महादेव कानगुडे यांचा चार अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायलयाने फेटाळले. या दोघांविरोधात माढा पोलिस ठाण्यात फसवणुकीबाबत चार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये अटक टाळण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सरकारच्यावतीने ॲड. दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.

बार्शी तालुक्यातील सर्जापूर येथील जय जगदंबा बहुउद्देशीय संस्थेची माढा तालुक्यातील जामगाव येथे माध्यमिक आश्रमशाळा आहे. या संस्थेचे सचिव बाळासाहेब कोरके असून आश्रमशाळेचा मुख्याध्यापक पांडुरंग कानगुडे आहेत. सदरच्या आश्रमशाळेला समाजकल्याण विभागाच्यावतीने अनुदान मिळते.

या आश्रमशाळेतील हनुमंत क्षीरसागर, हरी पोटभरे, शिवाजी घुगे, समाधान हजारे या चार शिक्षकांना जून २०१० ते एप्रिल २०१३ दरम्यानचा पगार मिळाला नव्हता. त्याबाबत त्यांनी समाजकल्याण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर चौघांचा थकित पगार एकत्रितरित्या ३८,८२,५१८ रुपये आश्रमशाळेच्या बँक खात्यावर १६ डिसेंबर २०१३ रोजी जमा करण्यात आला असल्याची माहिती त्यांना मिळाली.

Post a Comment

0 Comments