नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार हे पुन्हा मुख्यमंत्रिपदी राहिले आहेत व भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्रि पदावरून पायउतार व्हावे लागले होते. अखेर भाजपने नाराज असलेल्या मोदींना राज्यसभा उमेदवारी देऊन त्यांचे पुर्नवसन केले आहे. राज्यसभेची उमेदवारी पक्षाने देऊनही मोदींची नाराजी कायम असून, त्यांनी यावरुन पक्षाला आता घरचा आहेर दिला आहे.
तरीही सुशीलकुमार मोदी यांची नाराजी कायम असून, त्यांनी आता पुन्हा पक्षावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमच्या भाजपमध्ये केवळ वन-वे ट्राफिक आहे. भाजपमध्ये तुम्ही येऊ शकता मात्र, येथून बाहेर जाऊ शकत नाही. भाजप सोडणारे लोक कधीही शांततेने राहू शकत नाहीत. सध्या मी बिहार सरकारचा घटक नसलो तरी राज्यातील सध्याच्या भाजप-जेडीयू सरकारमध्ये माझा आत्मा आहे.
भाजपने उपमुख्यमंत्रिपदी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांची निवड केली होती. सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्री देण्यात आले नव्हते. याबद्दल मोदी यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. त्यांनी ट्विटरवर म्हटले होते आहे की, भाजप आणि संघ परिवाराने माझ्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दित दुसऱ्या कोणाकडून मिळणार नाही एवढे दान दिले आहे. यापुढेही पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती पार पाडू. माझे कार्यकर्ता पद तर कोणी काढून घेऊ शकत नाही.
0 Comments