दिलदार कोल्हापूर अशी ओळख असलेल्या आपल्या शहरात अनेक पशु-प्राणी प्रेमी संस्था आहेत. त्यामध्ये जखमी झालेलया प्राण्यांवर तातडीने उपचार ,संगोपन करून जीवनदान देणारी संस्था म्हणजे कारे सोसायटी. या सोसायटी मध्ये रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर कडून अग्ली कोल्हापुरी अंतर्गत स्वछता मोहीम राबविण्यात आली.
रस्त्यांवर दररोज अनेक पाळीव व अनाथ जनावरे छोट्या मोठया अपघातांमुळे जखमी होत असतात तसेच त्यांना माणसाप्रमाणेच अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आशा सर्व प्राण्यांना या कारे सोसायटी मध्ये मायेची उब मिळते. नंतर या तंदुरुस्त झालेल्या प्राण्यांना जबाबदार लोक दत्तक घेतात. आशा पध्दतीने दुसरा निवाराच व कुटुंब या प्राण्यांना मिळते.
या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो प्राण्यांवरती यशस्वीपणे उपचार करून त्यांना दत्तक देण्यात आले आहे. याच सदकार्यासाठी हातभार लागावा म्हणून रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर कडून अग्ली कोल्हापूरी या अंतर्गत पूर्ण स्वछता करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात या संस्थेसाठी आणखी करता येईल तितकी मदत देण्यात येईल अशी माहिती रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर चे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली.
या प्रसंगी कारे सोसायटी च्या संस्थापिका सौ. संयोगीता माने , रोट्रॅक्ट चे सचिव मानव गुळवणी, प्रकल्प अधिकारी शुभम जाधव, यश मालगावे, मृणाल शिंदे, सुधान्शु रूकडीकर, धृव मोदी, प्रियांका गोंडालिया, अथर्व धनाल, पियुष आगरवाल, शर्मिष्ठा पाटील, विजय राठोड, शिविका ओझा, पूजा शहा, यश पारेख, श्रीहरि, स्वप्नील कटवे ,संग्राम देसाई आदी उपस्थित होते.
0 Comments