राज्य सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी दे असे साकडे विठ्ठला चरणी मराठा समन्वयकांनी घातले



पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर येथील  साडे अकराच्या सुमारास मराठा बांधवांना शासनाचा आदेश जुगारून नामदेव पायरीचे दर्शन घेऊन मोर्चास सुरवात केली. नामदेव पायरी जवळ मराठा क्रांती मोर्चातील काही मोजक्या कार्यकर्त्यांना नतमस्तक होत मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्याची  व  अन्य मागण्या मान्य करण्याची सदबुद्धी दे असे साकडे  विठ्ठला चरणी साकडे घातले व आंदोलनाची सुरुवात केली. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी ते पंढरपूर शहर पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर दहा गाड्यांमध्ये मराठा बांधव बसून पुण्याकडे रवाना झाले आहे आहेत. त्याठिकाणी मुख्य सचिवांसह मराठा बांधवाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे पदाधिकाऱ्याने सांगितले.

सध्या कोरोनाची या संसर्गजन्य रोगाच्या संकटाचे सावट हटली नाही.यामुळे पंढरपुरात गर्दी होऊ नये. नागरिकांचे आरोग्य धोक्यात पडू नये. यासाठी मराठा समाजाचा मोर्चा गर्दी करु नये अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. तसेच अधिकची सुरक्षा म्हणून पोलीस प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त लावला होता. सकाळी नऊ वाजल्यापासून मराठा समाजाचे पदाधिकाऱ्यांनी शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात केली होती. 

विठ्ठल मंदिर ते पंढरपूर शहर पोलीस ठाण्यापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी चौक ते पंढरपूर पोलीस स्टेशन इथपर्यंत मराठा क्रांती मोर्चा पायी दिंडी ला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली. मात्र मराठा क्रांती मोर्चा पायी दिंडी पोलीस स्टेशन पर्यंत आल्यानंतर पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना थांबवत पायी दिंडी स्थगित करण्याची विनंती केली. मात्र काही काळापुरता आंदोलनकते व पोलीस मध्ये पायी दिंडी त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी व समन्वयक जागेवरच ठिय्या आंदोलन करत पोलीस प्रशासनाला जाऊ देण्याची विनंती केली. मात्र काही काळानंतर पोलीस आंदोलनकर्ते यांच्या समंजसपणाची भूमिका घेत पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा काढण्यासाठी पायी दिंडी  ऐवजी वाहनातून मंत्रालयापर्यंत प्रवास करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाकडून दिली गेली, त्यानंतर मराठा मोर्चातील मोजके कार्यकर्ते वाहनातून पोलीस बंदोबस्तात मुंबईच्या दिशेने रवाना झाली. यामुळे मराठा आरक्षण प्रश्न आता मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक मंत्रालयातील मुख्य सचिवांसमोर आपल्या मागण्या मांडणार आहे.  या वाहनांसह पोलिस प्रशासनाने पोलीस बंदोबस्तही रवाना केला आहे.

Post a Comment

0 Comments