ठाकरे सरकारचे विदर्भ-मराठवाड्याकडे दुर्लक्ष - देवेंद्र फडणवीस


“ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा-विदर्भ नाहीच. नवीन सरकारने औरंगाबादच्या निधीलाही स्थगिती दिली. असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला. 
(Advertise)

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी फडणवीस औरंगाबादमध्ये आले होते त्यावेळी ते बोलत होते.
(Advertise)

“मागच्या वेळी गोपीनाथ मुंडे गेल्यामुळे भाजपचा पराभव झाला, मात्र शिरीष बोराळकर यांनी चांगली मतं घेतली होती. यावेळी मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही चंग बांधला आहे. मराठवाडा आणि विदर्भाचं चित्र बदलल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही” असं फडणवीस म्हणाले. 
(Advertise)

“केंद्राच्या निधीतून आम्ही विकास केला, मराठवाड्याशी संबंधित दोन योजना दिल्या, यात मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजनाही होती. पण या योजनेला सरकारने स्थगिती दिली आहे. ते काम ठप्प आहे. समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी बकेटमध्ये आणण्यासाठी योजना केली, निधीची तरतूद केली, पण तेही काम बंद पडलेलं आहे” असं फडणवीस म्हणाले.

Post a Comment

0 Comments