बार्शी: प्रेमिकेसोबत लग्न करण्यासाठी अडसर ठरणा-या आपल्या नवविवाहित गर्भवती पत्नीचा फिरावयाच्या बहान्याने जंगलात निर्जन स्थळी घेवन जावून डोक्यात दगड व चाकु घालून खुन करणा-या व जबरी चोरीचा बनाव करणार्या पती महेश भारत मिसाळ वय २४ वर्षे, रा.खामसवाडी, ता.कळंब यास बार्शी सत्र न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश अ.ब.भस्मे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
यात हकिकत अशी की, दादाराव महादेव फुगारे, रा.कोंबडवाडी ता.जि. उस्मानाबाद यांनी मुलगी मनिषा हिचा विवाह खमासवाडी येथील रहिवासी महेश भारत मिसाळ यांचे बरोबर दि.०७/०५/२०१७ रोजी झाला त्यापासून मयत मनिषा ही गर्भवती राहिली मात्र महेश मिसाळ याचे त्याचे नात्यातील मुलीबरोबर प्रेमसंबंध होते.
पत्नी मनिषा ही त्याचे लग्नास अडसर ठरत होती. त्यामुळे अत्यंत विचारपुर्वक एखाद्या हिंदी सिनेमात शोभेत अशा पध्दतीचा कट महेश मिसाळ याने रचला. महेश मिसाळ हा पुणे येथे मयत मनिषा बरोबर राहत होता तो सतत त्याचे प्रेमिकेबरोबर मोबाईलवर संपर्कात होता. महेश ने त्याची पत्नी मनिषा हिस प्रथम तिचे माहेरी मौजे कोंबडवाडी हुन घेऊन आला व तेथुन तो मनिषास त्याच्या बहिनीच्या गावी मौजे पाथरी ता बार्शी येथेवून जाण्यासाठी म्हणून सासुरवाडीतुन निघाला.
बहिनीच्या गावी जावून परत येताना त्याने मनिषा हिस आडवाटेने येडेश्वरी येथील सुनसान जंगलात घेवून जावून तेथे लघवीच्या बहाण्याने थांबला. साहजिकच मयत ही तोंड फिरवून थांबली तेव्हा महेशने मनिषावर पाठीमागून दगडाने हल्ला केला व पुन्हा चाकुने डोक्यात वार केला व स्वतःअंगावर अठरा जखमा करून घेतल्या व चोरांनी मारहान केली असा बहाणा करुन मयत पत्नीस तेथेच सोडून स्वतः उस्मानाबाद येथील शासकिय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अॅडमिट झाला. मयताचे वडील फुगारे यांनी पांगरी येथील पोलीसांत तक्रार दिली.
महेश याचे अंगावरील किरकोळ जखमावरुन तपास अधिकारी धनंजय ढोणे यांना महेश सांगत असलेल्या हल्याबाबत शंका आली व त्यांनी त्वरीत तपास करुन बाकीकायदेशिर तपास सुरु केला. तेव्हा तपासअधिकारी ढोणे यांचे लक्षात आले की,आरोपीने हल्ला केल्याचा निव्वळ बनाव केला आहे.
न्यायालयात आरोपी तर्फे त्याचे
वकीलांनी असा बचाव मांडला की, मोटारसायकल ओव्हरटेक करण्यावरून अज्ञात लोकानी आरोपी महेश व मयत मनिषा यांचे वर हल्ला केला व त्या हल्ल्यात मनिषा हिचा मृत्यु झाला व अज्ञात लोकांनी केवळ मदत म्हणून महेश यास उस्मानाबाद येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सदर कामी सरकार पक्षा तर्फे अॅड शांतवीर महिंद्रकर यांनी केवळ चार साक्षिरांच्या साक्षी नोंदविल्या.
मात्र सदर प्रकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारपक्षा तर्फे गुन्हयाचा हेतु सिध्द करता येत नव्हता मात्र परिस्थितीजन्य पुरावा म्हणजेच आरोपीच्या अंगावरील किरकोळ जखमा अज्ञातहल्लेखोरांनी व त्यास सोडून पत्नीस केलेली मारहाण ही मान्य करता येण्यासारखी नाही, घटनास्थळ हे मुख्य रस्ता सोडून ४०० ते ५०० फुट जंगलात असणे, आरोपीने गुन्हयाची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला न देणे, जवळच्या दवाखान्यात उपचार न घेता उस्मानाबाद येथे अॅडमिट होणे.
व तेथे ही उपलब्ध असून ही पोलीसांत तक्रार न देणे या सर्व परिस्थीतीचा विचार करता व आरोपीचे गुन्हा घडल्या नंतरचे वागणे पाहता शिक्षा देण्या इतपस पुरेसा पुरावा न्यायालयासमोर देण्यात आला. या खटल्याचे आणखिन एक वैशिष्ट्य म्हणजे या खटल्यात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. सदर कामी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकुन न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व रु. २५,०००/- दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
सरकार पक्षातर्फे अँड शांतवीर महिंद्रकर, आरोपीतर्फे अॅड मिलींद थोबडे यांनी काम पाहिले. सदर कामी आरोपीचे रुपांतर गुन्हेगारात होण्यासाठी सदर कामी तपास अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व पांगरी पोलीस ठाणेचे कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार श्री दिपक परबत यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली.
0 Comments